यंदाचा ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ कैलाश सत्यार्थी यांना जाहीर, पुण्यात होणार कार्यक्रम
पुणे : यंदाचा ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2026’ नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांना जाहीर करण्यात आला आहे. पुण्यात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ज्येष्ठ संगीतकार, गायक पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी या पुरस्काराची घोषणा केली. हा पुरस्कार मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या 84व्या स्मृतिदिनानिमित्त म्हणजे 24 एप्रिल रोजी पुण्यात प्रदान केला जाणार आहे.